विद्युत तारेच्या झटक्याने कामगार जखमी, वरोरा रेल्वे प्लॅटफॉर्म येथील घटना


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (१६ जुलै) : वरोरा येथील रेल्वे स्टेशन वर काम करीत असतांना एका युवकाला विद्युत तारेचा झटका लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी ९ च्या दरम्यान घडली. जखमीवर प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

सविस्तर असे की, रोजी वरोरा रेल्वे स्थानकात पीएफ क्रमांक ४ च्या बाजूला लूप लाईन क्र. जीएल -१ येथे असलेल्या बॅलॅस्ट क्लीनिंग मशीन आरएम-८०-९२ यू (५६६१२) (BCM पी-वे विभागातील मशीन) सकाळपासूनच वरील लूप लाईन थांबविण्यात आले होते, ज्यात देखभालकरिता काम खासगी (कंत्राटी) मजदूर नाव संजय कुमार वय २० अंदाजे आहे. पत्ता देवरिया जिल्हा अरहरिया, बिहार येथील रहिवाशी असून हा वरील मशीनवर चढल्यानंतर काही साफ सफाईची कामे करीत असतांना, ०९: २५ च्या सुमारास ओएचई (OHE) च्या संपर्कात आला आणि हाय व्होल्टेज करंट च्या संपर्कात आला तेथील मशीनवर पडला, त्यानंतर आर. पी. एफ. मॅडम, वरोराच्या एसआयपीएफ (SIPF) मानकर मॅडम, आ. सचिन नागपुरे आणि प्रा. आर. डी. म्हात्रे यांनी तत्परता व दक्षता दाखवत मशीनमध्ये ठेवलेली अग्निशामक यंत्र बाहेर काढून जखमींना लागलेली आग विझवली आणि जखमींला प्लॅटफार्म खाली आणले. यावेळी एसएसई (SSE/WRR) डब्ल्यूआरआर श्री. गुप्ता यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी हजेरी लावली. तातडीने खासगी रुग्णवाहीकामधून सचिन नागपुरे यांनी जखमींना शासकीय रुग्णालय वरोरा येथे भरती केले, प्राथमिक उपचार करण्यात आले. कर्तव्यानंतर डॉक्टरांनी जखमींना चंद्रपूर शासकीय रुग्णालय येथे रवाना करण्यात आले. जखमीवर उपचार सुरु चालू आहे. जखमींची प्रकृती सध्या ठीक असून जखमीवर डॉक्टरांनी उपचार चालू असताना ४१ टक्के जळल्याचे आढळले.
आर.पी. एफ. (RPF) वरोरा यांनी जखमीला संयमाने व पूर्ण देखरेखीखाली रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने व योग्य वेळी त्यांचे उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. जखमी हा बिहारचा रहिवासी असून वरोरा येथे त्याचे कुणीही नाही. आर. पी. एफ. वरोराचे सचिन नागपुरे यांनी जखमीच्या कुटूंबियांना घटनेची माहिती दिली आणि त्याच्या प्रकृतीची पूर्ण माहिती दिली, यावर संजय च्या घरच्या लोकांनी आर.पी.एफ. चे आभार मानले असे रेल्वे कडून सांगण्यात येत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post