मुखेड तालुक्यातील दिव्यांगाचे बार्हाळी ग्रामपंचायत समोर थालीनाद आंदोलन


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (३१ जुलै) : जिल्ह्यातील दिव्यांगानी आपल्या हक्कासाठी दि. ३० जुलै रोजी मुखेड तालुक्यातील बा-हाळी येथे
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय समोर कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी आज मुखेड तालुक्यातील बा-हाळी येथे दि. ३० जुलै २१ दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराल डाकोरे पाटिल, ता. अध्यक्ष आर एम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत समोर थालीनांद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात घोषणेने थालीनांद करून परिसर दणाणून टाकले त्या वेळी निवेदन  स्वीकारण्यासाठी सशश ग्रामसेवकांनी निवेदन स्विकारून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. खालील मागण्या संदर्भात दिव्यांगानी घोषणेने थालीनांद करून आपला संताप व्यक्त केला. 
       
ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून २०१६ ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा. 
दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगाना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.

दिव्यांग कायदा २०१६ ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन देऊळ अंमलबजावणी करणे बाबत, पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी.

दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावा. 
दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा २०० फुट जागा त्वरीत देण्यात यावा. दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाईमुळे करावी.
    
थालीनाद आंदोलनात दिव्यांग वृध्द निराधार मिञमंडळ महाराष्ट्र मुखडे ता.अध्यक्ष रामकिसन कांबळे ता ऊपअध्यक्ष मगदुम शेख,ता सचिव रंजीत पाटिल इंगळे,पांचाळ वैजनाथ, मजा चव्हाण, हनमत बोईनवाड,माया फुलारी, योगेश देशमुख, मौलासाब तांबोळी, शंकर बोईऩवाड, गोपाळ गायकवाड, पांडूरंग गुडघे,ईत्यादी कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी केले.
मुखेड तालुक्यातील दिव्यांगाचे बार्हाळी ग्रामपंचायत समोर थालीनाद आंदोलन मुखेड तालुक्यातील दिव्यांगाचे बार्हाळी ग्रामपंचायत समोर थालीनाद आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.