टॉप बातम्या

वाचनालयास पाच हजार रुपयांची पुस्तके देऊन केला वाढदिवस साजरा

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (७ जुलै) : आज वाढदिवस साजरा करण्याचा 'ट्रेंड' जरा हटके आहे, हे सर्वांनी बघितलं, अनुभवतोय. या ब'डे ला काय काय प्लॅनिंग केलं जातं, हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे,जणू काही लग्नाची तयारी च करतोय. असं वातावरण आपल्यात असतं. मात्र, काही असे ही वाढदिवस साजरे होतात किंबहुना साजरे केले जातात त्यांचा उल्लेख केल्या विना राहावत नाही. त्याची चर्चा होतेच, अशीच चर्चेचा विषय ठरलेला आज चा 'बर्थडे'. मा.श्री.राजु बाबारावजी लडके यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरड (ने) येथील एपीजे अब्दुल कलाम वाचनालयातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा उसाह वाढवा म्हणून स्वतः त्यांनी या वाचनालयास पाच हजार रुपयांची ची पुस्तके देऊन आपला वाढदिवस साजरा केला. या स्तुत्य वाढदिवसाच्या निमित्ताने येथील सर्व वाचनालयाचे सदस्य गण चेतन खारकर, विवेक मालेकार, प्रसंजित खैरे, वैभव नांदेकर, अमित पंधरे, निकेश भगत, पवन निमसटकर, प्रशांत पंधरे आदींनी श्री. लडके यांना यांच्या अभिष्टचिंतन दिनी निरोगी दीर्घायुष्य लाभोत अशा मनस्वी सदिच्छा देऊन त्यांचे मनपुर्वक आभार मानले. या पुढे वाढदिवस अशाच पद्धतीने साजरे करू असे मत सर्वांनी यावेळी व्यक्त केले. 

संकलन : शंकर घुगरे (गुरुजी)
Previous Post Next Post