टॉप बातम्या

आज उपोषणाचा ३ दिवस : दिव्यांग महिलेचे आमरण उपोषण सुरूच


सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (७ जुलै) : तालुक्यातील करणवाडी येथील सीमा अफरोज खां या दिव्यांग महिलेचे अश्लील शिवागीळ व खोटे गुन्हे दाखल केल्याच्या आरोपावरून मारेगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरु आहे. सदर महिलेचे दोन्ही पाय अपघातात गमावल्याचे समजते. 

सीमा अफरोज खां या महिलेच्या घरी मागील मे महिन्यात ठाणेदार मंडलवार साहेब व बिट जमादार यांनी अश्लील शिवागीळ करीत घराची झाडाझडती घेत सामानाची फेकफाक केल्याचा आरोप आहे. परिणामी स्वतः आणलेल्या दारूच्या बाटल्यासह सीमा हिचे छायाचित्र मोबाईल मध्ये कैद केले असाही आरोप दिव्यांग पीडितेने केला.

महिलेचे पती घरी नसताना दुसऱ्या दिवसाला महिलेसह आई व पतीवर अवैध दारूचे खोटे गुन्हे दाखल केले. असा आरोप पीडित महिलेने केला आहे. सदर प्रकरण पूर्णतः खोटे असताना मला नको त्या भाषेत अश्लील शिवागीळ खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई या प्रमुख मागणीसाठी तीन पासून ही दिव्यांग महिला पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसली आहे.
Previous Post Next Post