सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (७ जुलै) : मारेगाव शहरातील दोन दुचाकी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या होत्या. पोलीसांच्या अथक परिश्रमाने या वाहनचोरांना पकडण्यामध्ये यश आलेले असून, हे वाहनचोर सध्या यवतमाळातील जेलमध्ये हवा खात आहे.
मारेगाव शहरातील नगरपंचायतचे मागे असलेल्या भोगेकर यांची दुचाकी भर दुपारी घरासमोरून दुचाकी हिरो स्प्लेण्डर क्र.MH29- AJ 6564 ही २०/५/२०२१ किंमत ४० हजार रुपये चोरी गेली होती. तर दुसरी दुचाकी प्रभाग क्र. १७ मधून तलाठी यांच्याकडे कामासाठी आलेले वागदरा ता. मारेगाव येथील सोनेराव अय्या टेकाम यांची हिरो होंडा MH29 K 1601 किंमत १० हजार रुपये या चोरीला गेल्या होत्या. तसेच अशाचप्रकारे वाहने पांढरकवडा परिसरातही गेल्या होत्या. पांढरकवडा पोलिसांनी याविषयी कारवाई करीत रा. साखरा ता. घाटंजी येथून ५ जणांना अटक केली. या ५ जणांनी वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा, यवतमाळ, आदीलाबाद येथून २० दुचाकी चोरल्याचे कबूल केले.
मारेगाव पोलिसांनी चौकशी सुरू केली असता यातील दोघांनी मारेगाव येथून दोन वाहने चोरल्याची कबुली दिली. यातील सागर तुळशीदास भेंडारे, २४ आणि विजय विलास ढोके २६, या दोघांना मारेगाव पोलिसांनी चौकशीसाठी आणून त्यांच्याकडून शहानिशा करून त्यांना यवतमाळ येथील जेलमध्ये पुन्हा पाठवण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल चौधरी, जमादार आनंद अलचेवर, सुलभ उईके, बंटी मेश्राम यांनी केली.