टॉप बातम्या

आठवडी बाजारातून मोबाईल चोरी; मारेगाव पोलिसात तक्रार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शहरातील आठवडी बाजारातून एका व्यक्तीचा मोबाईल चोरी गेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली असून, याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेख हबीब शेख इस्माईल असे तक्रारदाराचे नाव आहे.

मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी काही कामानिमित्त शेख हबीब हे मारेगावच्या आठवडी बाजारात गेले असता त्यांच्या जवळील वनप्लस 10 प्रो 5G कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. मोबाईल हरवल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ मारेगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली.
या घटनेमुळे गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः आठवडी बाजारात चोरटे संधी साधून नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षितते करिता बाजारात वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा दल अधिक वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();