टॉप बातम्या

खातेरा येथे वीज पडून २६ बकऱ्याचा जागेवरच मुत्यू

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (७ जुलै) : झरी तालुक्यातील खातेरा येथे विज पडून २६ बकऱ्याचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली.

खातेरा परिसरात आभाळ दाटून आले असता, चार वाजताच्या दरम्यान, विजेचा कडकडाट सुरु झाला असून, पावसाला सुरुवात झाली. यावेळी बकऱ्या चरत होत्या अशातच जोरदार विज पडली आणि दुर्दैवाने २६ बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 यामध्ये बळीराम गोडे ३, नग धर्मा वाघाडे १, दशरत बुट्टे २ नग, शंकर गायकवाड २ नग, दत्ता जुनगरी १ नग, नारायण भोयर १ नग, अंबादास वासेकार १ नग ,सचिन पांडे ५ नग, विकास आगरकर ३ नग ,पंढरी गेडाम ५ नग, अमोल सोनटक्के १ नग, सचिन पांडे १ नग अशा एकूण २६ च्या वर बकऱ्या दगावल्या.

ही घटना गावापासून एक किमी अंतरावर चराई साठी गेलेल्या जंगलात घडली. या दरम्यान, जोरदार पाऊस व विजेचा कडकडाट झाला. ज्यामुळे ह्या शेळ्या जागीच ठार झाल्या अशी माहिती मिळाली.
Previous Post Next Post