वणी, (१४ जुलै) : येनक जंगल शिवारात एका पन्नास वर्षीय इसमाचा संशयास्पद मृत्यू आढळून आला होता. मृतक शेषराव गजानन पिंपळशेंडे रा. शिवनी (जुनी) असे मृताकाचे नाव आहे.
घटनेचीमाहिती मिळताच शिरपूर चे ठाणेदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृत्यूदेह वणी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला.
मात्र, घटनास्थळी मृतकाच्या डोक्यावर तोंडावर दगडाने ठेचल्याचे निशाण हे कोणी तरी हत्या केल्याचे संकेत देत होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तीन पथक तयार करून त्या अज्ञात आरोपीच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या दोन तासात आरोपीचा छडा लावत अटक केली.
पोलीस सूत्राच्या माहितीनुसार घटनेला शुल्लक वादाची किनार असल्याचे कारण समोर आहे. आरोपी गावातीलच असून, लहू श्रीराम आत्राम (२३) असे नाव आहे. आरोपी हा गवडी काम करीत असून, घटनेच्या दिवशी दोघेही एकाच मोटारसायकल वर जाताना दोघाला गावाकऱ्यांनी पाहले अशी चर्चा आहे. व दोघांना ही दारू व्यसन ची सवय असल्याचे ही बोलल्या जाते.
विशेष उल्लेखनीय असे की, घटनेच्या दिवशी आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.