बेंबळा धरणाचे दोन दरवाजे उघडले, निसर्गप्रेमींची धरणावर गर्दी करण्याची शक्याता

सह्याद्री न्यूज नेटवर्क |  
यवतमाळ, (१४ जुलै) : जिल्ह्यातील बेंबळा धरणामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा संचय झाला आहे. यामुळे प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले. धरणाचे  दरवाजे १० सेंटीमीटरने उघडले असता बाभुळगाव, कळंब, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या बेंबळा प्रकल्प हा ६५ टक्के भरला आहे. शनिवारी पडलेल्या पावसाने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा  संचयात वाढ झाली.

कोरोनाच्या या काळात निसर्गप्रेमी या धरणावर   बघावयास गर्दी करण्याची शक्याता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पाऊले उचलणे गरजेचे आहे. 
बेंबळा धरणाचे दोन दरवाजे उघडले, निसर्गप्रेमींची धरणावर गर्दी करण्याची शक्याता बेंबळा धरणाचे दोन दरवाजे उघडले, निसर्गप्रेमींची धरणावर गर्दी करण्याची शक्याता Reviewed by सह्याद्री चौफेर on July 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.