सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (३ जुलै) : दि.२८ जून २०२१ ला विदर्भ साहित्य संघ वणी शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष पदी प्रा. डॉ. सुप्रसिद्ध नाट्यकर्मी दिलीप अलोणे, राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन कासावर यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तसेच जेष्ठ मार्गदर्शक वणी शाखेचे आधारस्तंभ श्री. माधव सरपटवार यांची कार्याध्यक्ष पदी तर प्राध्यापक डॉ.अभिजित अणे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. यामध्ये सहसचिव कवी राजेश महाकुलकर, कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथरडकर, कोषाध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यासोबत डॉ. प्रसाद खानझोडे, अशोक सोनटक्के, अमोल राजकोंडावार, जयंत लीडबीडे आणि गजानन भगत यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षात यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, तीन पुस्तकांचे प्रकाशन आणि हेमंत व्याख्यानमाला इत्यादी कार्यक्रम अशी या शाखेची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी पुढील काळात देखील राहिल असा विश्वास या नवनियुक्तनंतर अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप अलोणे आणि सचिव अभिजित अणे यांनी व्यक्त केला.
विदर्भ साहित्य संघ कार्यकारिणी गठीत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 02, 2021
Rating:
