सह्याद्री न्यूज | राजविलास
यवतमाळ, (२ जुलै) : जिल्ह्यात युद्घपातळीवर कोरोनाचा संर्सग रोखण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, कोविशिल्ड लसींचा तुटवडा असल्याने कर्मचारी व विद्यार्थ्यांना लस मिळत नाही.
या संदर्भात युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात केवळ १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. दुसरा डोस घेणार्यांची संख्या अधिक असताना त्यांनाही केंद्रावरून माघारी पाठविण्यात येत आहे.
उपलब्ध असलेल्या लसींची संख्या लक्षात घेता सरसकट सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कोविशिल्ड लसींचा यवतमाळ जिल्ह्यात तुटवडा : युवक काँग्रेसचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 02, 2021
Rating:
