बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविला पावणे दोन लाखांचा मुद्देमाल

                            (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता. १ जुलै) : घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरटयांनी घरफोडी केल्याची घटना आज १ जुलैला वणी तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे उघडकीस आली. बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
मारेगाव (कोरंबी) येथील रहिवाशी असलेले डॉक्टर सुरेंद्र शिवनारायण भोगे (४३) हे आजारपणामुळे शहरातील मारूती टाऊनशिपमध्ये रहात होते. त्यांचे मूळगाव असलेल्या मारेगाव (कोरंबी) येथील घरी अज्ञात चोरटयांनी संधी साधून चोरी केली. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, व सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांना शेजाऱ्यांनी फोन करून घराचे दार खुले असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी गावाकडील राहत्या घराकडे धाव घेतली. तेथील सर्व प्रकार बघून घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या आत जाऊन बघितले असता रोख रक्कम व दागिन्यांवर चोरटयांनी डल्ला मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ५० हजार रुपये रोख रक्कम, ५५ ग्राम सोने (१ लाख ३० हजार रुपये) व दोन तोळे चांदी (५ हजार रुपये) असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला. डॉ. सुरेंद्र भोगे यांनी घरफोडी झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविला पावणे दोन लाखांचा मुद्देमाल बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविला पावणे दोन लाखांचा मुद्देमाल Reviewed by सह्याद्री चौफेर on July 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.