सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१४ जुलै) : संभाजी चौक सिडको नांदेड येथील पिण्याच्या टाकीचे काम गेले तीस वर्ष होऊन पूर्ण झाले तरी त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले आहे. पण याकडे सिडको प्रशासन किंवा महापालिका लक्ष देत नाही नसल्याने या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
येथील आजूबाजूच्या राहणाऱ्या नागरीकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. 'जल ही जीवन' असे म्हणतात, त्याच पिण्याच्या टाकीच्या सभोवताल घण कचरा, पाण्याच्या बाटल्या, इत्यादी केरकचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे त्या परिसरात राहणा-या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसून यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबीकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून टाकीच्या सभोवताल चा साचलेला घण कचरा त्वरित साफ करावा, याकडे दुर्लक्ष केल्यास वंचित महिला आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्ष दैवशाला पांचाळ यांनी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
नांदेड: गौतम गावंडे
नांदेड येथील पिण्याच्या टाकीच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 14, 2021
Rating:
