सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव, (३१ जुलै) : समाज कार्यासाठी निर्माण होत असलेल्या समाज भवनाचे केवळ पिल्लर उभे करून भवनाचे बांधकाम चार महिन्यापासून रखडले आहे. लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक नगरपंचायत जवळ हनुमान मंदिराला लागून असलेल्या खुल्या जागेवर एक समाज भवन बनावे या मागणीसाठी काही प्रतिष्ठित नागरिकांनी समाज भवनासाठी वणी विधानसभेचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे आग्रही मागणी घालून त्यांच्या पुढाकाराने २० लाखांचा निधी भावनासाठी मिळाला. मात्र, गेल्या तीन चार महिन्यापूर्वी सुरू झालेले समाज भवनाचे बांधकाम पिल्लर उभे करून थांबल्या गेले असून, पुढील बांधकामाचा वेग मंदावल्याने बांधकाम बस'स्टॉप आहे.
तातडीने समाज भवनाचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मारेगाव: समाज भवन मंदिराचे काम ४ महिन्यापासून रखडले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 31, 2021
Rating:
