टॉप बातम्या

शेतकऱ्याचे अनोखे जुगाडू तंत्र ठरत आहे कौतुकास्पद, ट्रॅक्टरच्या सहाय्याने डवरणीसह फवारणी


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (४ जुलै) : तोट्यात जात असलेल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. बाभूळगाव तालुक्यातील दिघी येथील शेतकऱ्याने जुगाडू वृत्तीचा परिचय दिला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने डवरणीसह फवारणी करीत आहे.

दिनेश परडखे,असे जुगाडू शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत लहान ट्रॅक्टर मिळाला होता. त्या ट्रॅक्टरची चाके काढून केरळ येथून खास चाके बनवून आणली. ही चाके चिखलात फसत नाही.

ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी, डावरनी करतो. इतकेच नव्हे तर इतरही शेतकऱ्याच्या शेतात फवारणी करून अधिक नफा मिळवतो. यात मनुष्यबळ कमी लागत असून दिनेशचा जुगाडू ट्रक्टर पंचक्रोशीतील कौतुकाचा विषय ठरत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();