फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणी महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
जोहान्सबर्ग, (ता.८) : – India today वृत्त नुसार ६२ लाख रुपयांची फसवणूक आणि बनवाट कागदपत्रांच्या प्रकरणी महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणतीला डर्बन कोर्टाने सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी कोर्टाने आशिष लता रामगोबिन यांना दोषी ठरवले. व्यापारी असल्याचे सांगून लता यांनी स्थानिक व्यावसायिकाची ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. नफ्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते, असे फसवणूक झालेल्या एसआर महाराज यांनी सांगितले.
लता यांच्यावर उद्योजक एसआर महाराज यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लताला माल आयात करण्यासाठी व सीमाशुल्क भरण्यासाठी महाराजांनी ६० लाख रुपये दिले होते. पण असा कोणताही माल महाराजा यांच्याकडे पोहोचवण्यात आला नाही. लता यांनी आश्वासन दिले होते की या नफ्यातील काही भाग ती एसआर महाराजांना देणार आहे.
प्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची लता रामगोबिन मुलगी आहे. डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टाने लता रामगोबिन यांना शिक्षा सुनावल्यानंतर अपील करण्यासाठी परवानगी नाकारली होती. लता रामगोबिन यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर वितरकांचे संचालक महाराज यांची भेट घेतल्याची माहिती कोर्टाला सोमवारी देण्यात आली.
कपडे, बुटांची निर्मिती, विक्री आणि आयात महाराज यांची कंपनी करते. महाराज यांची अन्य कंपन्यांना नफा-समभागांच्या आधारे पैसेही देते. दक्षिण आफ्रिकेच्या हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी तागाचे तीन कंटेनर आयात केले असल्याची माहिती लता रामगोबिन यांनी महाराजा यांना दिली होती.
आपल्याकडे आयात खर्च व सीमा शुल्क भरण्यासाठी पैशाची कमतरता आहे. तसेच बंदरावरुन सामान खाली उतरवण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे लता यांनी महाराजा यांना सांगितल्यानंतर लताने महाराज यांना सांगितले की तिला ६२ लाख रुपयांची गरज आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी लताने वस्तू खरेदी केला असलेला एक कागद महाराज यांना पाठवला होता. त्यानंतर हा कागद खोटा असल्याचे समोर आल्यानंतर महाराज यांनी लता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणी महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 09, 2021
Rating:
