टॉप बातम्या

वणी-यवतमाळ मार्गावर रास्तारोखो, अर्धा तास मार्ग ठप्प

सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (ता.२६) : स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुकीतील ओबीसीचे रद्द केलेले आरक्षण पूर्वरत करा या मागणी साठी तालुका भाजपाचे वतीने मारेगाव येथे रास्ता रोखो आंदोलन करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुका मधील ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले. त्यामुळे ओबीसी समाजात आपला हक्क हिरावला गेला ही भावना निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपनामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहिला, असा आरोप भाजपाने केला असून आज राज्यव्यापी आंदोलन केले.

तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांचे नेतृत्वात येथील मार्डी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी वणी-यवतमाळ या जिल्हा मार्ग अर्धा तास रास्तो रोखो आंदोलन करण्यात आले. त्यामुळे एक तास वाहणे रोडच्या दोन्ही बाजुला अडकून पडली होती. त्या नंतर तहसील व पोलिस प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आंदोलनात तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शंकर लालसरे, अनुप महाकुलकर, विलास चिंचूलकर, प्रशांत नांदे, आनंद पचारे, गणेश झाडे, पवन ढवस, सुभाष खडसे, मारोती राजुरकर, मंगेश देशपांडे, सुनिता लालसरे, सविता दरेकर, शोभा नक्षने, सुनिता पांढरे, शालिनी दारुंडे आदीची उपस्थिती होते.
   
Previous Post Next Post