कविता
"भारतीय संविधान"
पारतंञ्य जाऊन देशाला
स्वातंञ्य मिळालं
लोकशाहिचं नव
गणराज्य मिळालं
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
ज्ञानानातुन देश हिताच राजदंड मिळालं
दिन दुबळ्यांच कवच कुंडल
भारतीय संविधान मिळालं
सर्व धर्म समभाव जाती पंथांच
ईथे एकात्मतेच प्रतिक मिळालं
विविध संस्कृती भाषेच
या देशाला अभिव्यक्ती स्वातंञ्य मिळालं
सर्व देश वासीयांना न्याय हक्काच
न्याय मंदिर मिळालं
दलित दिन दुबळ्यांना
स्वाभिमानाच जगण मिळालं
जनतेचा सर्वांगीन विकास
होण्यासाठी आरक्षण मिळाल
हा देश अखंड ठेवण्यासाठी
या देशाला भारतीय संविधान मिळालं
कवी
संतोष पहुरकर
किनवट जि. नांदेड
संपर्क : 9689240952