तालुक्यात आज ११ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


                                               (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.५) : तालुक्यात कोरोनाचा जोर कमी झाला असून कोरोनाची रुग्णसंख्याही मंदावली आहे. कोरोना संक्रमणाच्या गतीला ब्रेक लागला असून संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. प्रशासनाचे योग्य नियोजन व प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केल्या जात आहे. तालुक्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला असून तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. काल कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर आज केवळ ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. १३ रुग्ण कोरनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ५११३ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. ११ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील २ तर ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण कमी होऊन ४१ वर आले आहेत. 
आज ९७ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज करण्यात आलेल्या ६८ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये केवळ एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. आज ४० नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ७२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. ४१ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून २७ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहे. तर १० रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये चिखलगाव येथील ३, पुनवट २ तर येनक, कोलगाव, जैताई नगर, रंगनाथ नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्याचबरोबर माजरी व झरी तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा आज कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 




तालुक्यात आज ११ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तालुक्यात आज ११ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह Reviewed by सह्याद्री चौफेर on June 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.