टॉप बातम्या

मारेगाव तालुक्यात कोरोनाने घेलती 'विश्रांती'


                      (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मारेगाव, (ता.४) : तालुक्यात कोरोनाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. आज रोजी शुक्रवारला तालुक्यातील ग्रामिण भागासह मारेगाव शहराला निरंक ठेवत मोठा दिलासा मिळाला आहे.
 मागील दोन महिन्यापासून कोरोना महामारीने नागरिकांचे जिवन प्रभावित झाले होते. अनेकांना कोरोना संसर्ग बाधीत होऊन बहुतांश नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, तब्बल दोन महिन्याच्या प्रदीर्घ कालावधी नंतर रुग्ण संख्येत कमालीची घट होत आज रुग्णांचा आकडा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात निरंक आला. त्यामुळे तालुकावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
परिणामी आज शहरासह तालुक्यातील बाधितांचा वेग मंदावला जरी असला तरी ऍक्टिव्हची संख्या ४८ वर आहेत. तर बरे होवुन घरी परतलेल्यांची संख्या १८ आहे. नुकतेच अनलॉक झाले असल्याने शहरात बाजारपेठ फुलून वर्दळ वाढली आहे. मात्र, असे असले तरी जनतेंनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post