नारंडा येथील सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (ता १०) : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील आज दिनांक 10 जून 2021 ला नारंडा येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नारंडा अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले, नारंडा येथे कित्येक दिवसा पासून दलित वस्तीच्या रोड च्या कामाची मागणी होती ते बघता आमदार साहेबाना मागणी केली असता त्वरित त्यांनी (25:15 ग्रामीण विकास निधी 2019-20)अंतर्गत मंजुरी करून दहा लाखाचा निधी प्राप्त करून दिली त्याबद्दल नारंडा ग्राम वाशीयानीं माननीय आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानले.

या उदघाटन प्रसंगी जे.इ. रामटेके मॅडम, पिंजरकर साहेब, जिल्हा परिषद सदस्य सौ. विनाताई मालेकर, प.स. उपसभापती सौ. शिंधुताई आस्वले, नारंडा गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. अनुताई ताजने, ग्राम सदस्य मिलिंद ताकसांडे, श्री. सुरेशजी मालेकर, प्रकाश मोहूर्ले, तुळशीराम भोंगळे, पुरुषोत्तम घुगुल, दीपक मोहूर्ले, प्रदीप मालेकर, मनोहर बोबडे, मारोती लोखंडे, सदाशिव पोटदुखे, मारोती पोटदुखे, शुभम माथनकर, बुद्धिष्ट कांबळे, गणेश मडावी, महेंद्र करमणकर, भाऊजी पोटदुखे, हिराजी वांढरे, राजेश राठोड उपस्थित होते.
हे विशेष..
नारंडा येथील सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन नारंडा येथील सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.