टॉप बातम्या

व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून लुटारुंनी लाखोंची बॅग लांबविली

लखन लोंढे | सह्याद्री चौफेर 

महागांव : शेजारील जिल्ह्यातून वसुली करून परत येत असतांना महागाव येथील एका किराणा व्यापाऱ्यावर खडका फ्लाय ओव्हर वर प्राण घातक हमला करून त्यांचे जवळील लाखोंच्या रकमेची बॅग लांबविली. सदर घटना आज बुधवारी 4 वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.
अनिल गंभीरमल शर्मा असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. अनिल हे किराणा मालाच्या रकमेची वसुली करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील वाईबाजार येथे गेले होते. येथून दुचाकीने परत येताना महागांव वरून  किमान 7 km अंतरावर असलेल्या खडका फ्लायओव्हर वर अज्ञात लुटारूंनी पाळत ठेवून त्यांची मोटरसायकल अडवली व हातावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने त्यांना गंभीर वार करून रकमेची बॅग जबरदस्तीने लांबविली. या रोड रॉबरीच्या घटनेत व्यापारी अनिल शर्मा हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी तातडीने पुसद येथे भरती करण्यात आले आहे.
बॅगमध्ये वसुलीची लाखो रुपये रक्कम असल्याचे कळते. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात रक्तरंजित असून व्यापारी अनिल यांची दुचाकी व चपला अस्ताव्यस्त पडल्या असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();