टॉप बातम्या

वणी येथे निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
 
वणी : संपुर्ण जगात फोटोग्राफर हा विविध क्षेत्रात विविध कार्याचे फोटो काढत असतो व फोटोग्राफर नसेल असा एखादाच कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. सर्व ठिकाणी फोटोग्राफर च्या कार्याचे कौतुक करण्यात येते आणि याच फोटोग्राफर यांचा सुध्दा वर्षातून एक दिवस म्हणजे जागतिक छायाचित्र दिवस..
वणी फोटोग्राफर एकता मंच च्या वतीने शहरात जागतिक छायाचित्र दिनानिमित्त 19 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन शहरातील बाजोरिया हॉल मध्ये करण्यात आले आहे. कार्यशाळेत नागपूर चे प्रसिद्ध व्हिडीओ एडीटींग रिल्स,लघुपट मार्गदर्शक समरेश अग्रवाल करणार आहे.  
ही कार्यशाळा निशुल्क असून सहभाग घेण्यासाठी स्व:ताचा फोटोकॅमेरा सोबत आणणे अनिवार्य आहे. या ठिकाणी मॉडेलिंग फोटोग्राफी स्पर्धा होणार असून विजेत्या स्पर्धकाला रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. वणी, झरी, मारेगांव व ईतर जिल्ह्य़ातील व शहरातील फोटोग्राफर बांधवानी या व्हिडीओ एडिटिंग मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आव्हान केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();