टॉप बातम्या

शासकीय कलावंत निवड समितीत नियुक्ती करा- सारिका उराडे यांची मागणी

सह्याद्री चौफेर | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील शासकीय कलावंत निवड समिती मध्ये आपली नियुक्ती करण्यात यावी अशी आग्रहाची मागणी अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर शहरातील समाजसेविका सारिका यशवंत उराडे यांनी आज चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे कडे सादर केलेल्या एका लेखी निवेदनातून केली आहे.

या पूर्वी सामाजिक व कलाक्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या सारिका उराडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक वुईके यांना याच मागणी संदर्भात एक निवेदन सादर केले होते. आज पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी स्थानिक नियोजन भवनात त्यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे.

अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून समाजसेविका उराडे यांनी वेळोवेळी कलावंतांचे प्रश्न व त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या आहेत.त्यांची या चंद्रपूर जिल्ह्याच्या कलावंत निवड समितीत नियुक्ती व्हावी अशी शहरवासियांची देखील अपेक्षा आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();