सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून मारेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी शामादादा कोलाम जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले, तर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांचा पत्नी चेतना विशाल किन्हेकर यांच्यासह जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आंबेडकरी अनुयायी, उपासक-उपासिका तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.