टॉप बातम्या

भालेवाडी येथे शहीद गोवारी स्मारकाचे अनावरण*

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : आदिवासी गोवारी जमातीने आपल्या न्याय हक्कासाठी २३नोव्हेंबर १९९४ ला महाराष्ट्र विधीमंडळाच्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशन प्रसंगी भव्य मोर्चा काढला होता.त्या मोर्चाचे वेळी पोलिस लाठीहल्ल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ आबालवृध्द व महीला मृत्यूमुखी पडल्या.त्या शहीदांना दरवर्षी २३ नोव्हेंबर ला आदिवासी गोवारी शहीद स्मारक नागपुर येथे लाखोच्या संख्येने गोवारी समाजबांधव श्रध्दांजली अर्पण करतात.त्याच स्मारकाची प्रतिकृती मारेगाव तालुक्यातील भालेवाडी येथे उभारण्यात आली. 

हे मारेगाव तालुक्यातील पहीले आदिवासी गोवारी शहीद स्मारक असुन याचे अनावरण आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.माधवराव कोहळे यांचे हस्ते पुजन व पिवळी फित कापुन करण्यात आले.
       
यावेळी बोलतांना माधवराव कोहळे म्हणाले की,आपल्या गोवारी जमातीची शिफारस सन १९५३ ला काकासाहेब कालेलकर आयोगाने भारत सरकारकडे केली परंतु प्रत्यक्षात १९५५ ला संसदेत पहील्या आनुसुचित जमाती दुरुस्ती विधेयकात गोवारीची नोंद गोंड अंतर्गत महाराष्ट्र अनुसुचित जमात यादीत क्रमांक १८ वर गोंड गोवारी अशी करण्यात आली.या सवलती १९८५ पर्यंत सतत चालु होत्या परंतु २४ एप्रिल १९८५ च्या एका परीपञकाद्वारे महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर पणे बंद केल्या असुन आपल्याला त्या पुर्ववत करण्यासाठी न्यायालयीन व राजकीय दृष्ट्या मोठा लढा उभारायचा आहे.त्यासाठी गोवारी युवकांनी व समाजबांधवांनी सज्ज राहावे.
    
या प्रसंगी श्री.संजय चचाने,अमोल गुरनुले यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री.हनुमान बुरुजवाडे हे होते.मंचावर शञुघन ठाकरे,विश्वनाथ राऊत,अमर गजबे,राजेश दुधकोहळे यांचे सह अनेकजन उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन श्री.बळीराम आञाम यांनी केले.तर आभार मनोज मुरखे यांनी मानले.
      

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भालेवाडीतील गजानन चामलाटे,मनोहर राऊत,दिनेश राऊत,दिपाली राऊत,सविता मुरखे,अनिकेत मुरखे,प्रदिप राऊत,संजय राऊत,वासुदेव चामलाटे,विजय मुरखे,मोरेश्वर राऊत,सुनिल दुधकोहळे,संदीप राऊत,गणेश लोहट,गजानन मुरखे,राजू मुरखे,चिंतामान नेहारे,प्रभा चामलाटे,पुष्पा राऊत,अनिता मुरखे,माला राऊत,सुवर्णा दुधकोहळे,वंदना मुरखे,रोशना चामलाटे,संगिता दुधकोहळे,विमल दुधकोहळे इत्यादींनी खुप प्रयत्न केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();