टॉप बातम्या

जुनोनी येथे संविधान दिन व क्रांतिकारी शामा दादा कोलाम यांच्यासह महापुरुषांची जयंती उत्साहात संपन्न!

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर रोजी झरी जामणी तालुक्यातील ऐतिहासिक जुनोनी नगरीत महामानव गौतम बुद्ध,स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावकारांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे क्रांतिकारी शामा दादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त भव्य महापुरुष जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला.

या जयंती उत्सवाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे,सामाजिक एकता निर्माण करणे तसेच समता,न्याय,स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा देण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकिसन आत्राम होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून पांडुरंग पोयाम, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार योगेश मडावी आणि मधुकर टेकाम उपस्थित होते.

यावेळी पोलीस पाटील इंद्रिरा टेकाम,ग्रामपंचायत सदस्य कविता आत्राम,वासुदेव गोवणे,नारायण मडावी, विनोद येडगुडे आणि देवानंद निखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान महापुरुषांच्या संघर्षमय जीवनकार्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजात एकता, बंधुता, समता आणि स्वाभिमानाची भावना रुजविण्याचे आवाहन मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.

रात्री ९ वाजता कला पथक गजानन ठाकरे यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमातून उपस्थितांचे मनोरंजन करण्यासोबतच सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन कोलाम पंच कमिटी व जुनोनी येथील समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. यामध्ये नायक भीमराव कुमरे, महाजन तुकाराम आत्राम, घट्या भीमराव आत्राम, कारभारी दिलबर कुमरे, गोविंदा मेश्राम यांच्यासह गावातील युवा युवती,महिला व पुरुष मंडळींनी विशेष पुढाकार घेतला.

महापुरुषांच्या विचारांचा जागर,सामाजिक एकता आणि स्वाभिमानाचा संदेश देणारा हा जयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();