टॉप बातम्या

चंद्रपूर : बाबूपेठ परिसरात युवकाची मारहाण करून हत्या; दोघे ताब्यात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

​चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ येथील आंबेडकर नगर परिसरात २७ वर्षीय पृथ्वी माहूरकर या युवकाची टोळक्याने जबर मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जीव वाचवण्यासाठी पळ काढत जवळच्या निवासात आश्रय घेण्याचा प्रयत्न करूनही गंभीर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला वृत्त समोर आले.

​घटनेची माहिती मिळताच रामनगर आणि चंद्रपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासास वेग दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, हल्ल्याचे नेमके कारण व इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();