टॉप बातम्या

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या समर्थनार्थ वणीत काँग्रेसचा निषेध मोर्चा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : दिल्लीतील आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी कथित गैरवर्तन झाल्याच्या निषेधार्थ वणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर वणी तहसील कार्यालयात निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली.

या मोर्चात काँग्रेस नेते संजय खाडे, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव डेव्हिड पेटकावार, जय आबड, विकेश पानघाटे, टिकाराम कोंगरे, शंकर वऱ्हाटे, जगदीश चौधरी, मनोज वाकटी, रामदास कुचनकार, नगरसेविका करुणा कांबळे, कुंदन पेंदारे, रविंद्र कांबळे, संदीप बोयरा, निखील मडावी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();