सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील लोकदूत वृत्तपत्राचे पत्रकार श्रीकांत किटकुले यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते नेहमीप्रमाणे वृत्तपत्रांचे वितरण करीत असताना अचानक भोवळ आल्याने त्यांना सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आकस्मिक निधनाने वणीतील पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.