टॉप बातम्या

आई एकविरा दुर्गा उत्सव मंडळ, नरसाळा येथे दुर्गा विसर्जन उत्साहात संपन्न


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

नरसाळा : आई एकविरा दुर्गा उत्सव मंडळ, नरसाळा येथे नवरात्रोत्सवानिमित्त विराजमान झालेल्या दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन भक्तिमय वातावरणात व उत्साहात करण्यात आले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान भक्तांनी जय माता दीच्या जयघोषात वाजतगाजत मिरवणूक काढली. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी दुर्गामातेला भावपूर्ण निरोप देत पुढील वर्षी लवकर येण्याचे साकडे घातले.

या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश नक्षने, उपाध्यक्ष विशाल काडसरपे, तसेच पवन मुसळे, प्रथमेश नेहरे, धनंजय तोडासे, यश मेश्राम, योगेश खंडरे, राम खंडरे, शिवम कुलमेथ, आणि गुरू नेहरे यांनी सहकार्य केले.

मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला. शेवटी ‘आई एकविरा मातेचा विजय असो’ आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात दुर्गामातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();