टॉप बातम्या

नशेपासून मुक्ती, योगातून नवजीवनाची प्राप्ती! -प्रा.महादेव खाडे

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ, वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘नशेपासून मुक्ती, योगातून नवजीवनाची प्राप्ती!’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन दि. १६ ऑक्टोबर २०२६  रोजी करण्यात आले. या व्याख्यानात ज्येष्ठ योग प्रशिक्षक प्रा. महादेवराव खाडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध प्रकार, त्यांचे महत्त्व तसेच व्यसनाधीनतेचे शरीर व मनावर होणारे दुष्परिणाम यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रा. महादेवराव खाडे यांनी योगाच्या विविध प्रकारांची माहिती देताना योगामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली विकसित करता येते. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी त्यांनी तंबाखू, मद्य, अमली पदार्थ आणि इतर व्यसनांचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम स्पष्ट केले. व्यसनांमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडण्याबरोबरच कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावरही विपरीत परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अभिजीत अणे होते त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना देशाचा सुदृढ नागरिक बनण्यासाठी व्यसनापासून दूर राहून स्वतःची प्रगती व देशाचा विकास याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले .राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी प्रास्ताविक मनोगतामध्ये

विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करणे, योगाचे महत्त्व पटवून देणे आणि निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी तरुणांना प्रेरित करणे हा या व्याख्यानाचा प्रमुख उद्देश समजावून सांगितला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा सकारात्मक संदेश देण्याकरिता कार्यक्रमाचे आहेत करण्यात आले आहे असे सांगितले . कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास जूनगरी यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक दीपक शाहू यांनी केले 215 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला


           -
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();