टॉप बातम्या

मोठी कारवाई : १ घरफोडी, १ घरफोडीचा प्रयत्न व बॅटरी चोरीचे ३ गुन्हे उघड; तीन आरोपी जेरबंद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : दि. १० जुलै : वणी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत १ घरफोडी, १ घरफोडीचा प्रयत्न आणि बॅटरी चोरी असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने शहरात गस्त व गुप्त माहिती संकलन सुरू ठेवले होते. त्यादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सुनील राजू मानकर (वय २२, रा. रंगनाथनगर, वणी) व राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (वय ३२, रा. रंगनाथनगर, वणी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी घरफोडी व घरफोडीच्या प्रयत्नाची कबुली दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ५५९/२०२६ व ५७०/२०२६ उघडकीस आला.

याच तपासादरम्यान विजय देवानंद मेश्राम (वय ३२, रा. नवीन लालगुडा, वणी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला.
या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम व दोन मोठ्या बॅटऱ्या असा एकूण २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही रॉबीन बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा प्रभार वणी, भानुदास पिदुरकर ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनाखाली डि.बी.पथक प्रमुख पोउपनि सैय्यद साजीद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, मारोती पाटील, निलकमल भोसले, पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर चालक शुभम किन्नाके, पोलीस महीला अंमलदार चैताली चेन्डे व पोलीस हवालदार यांनी पार पाडली.
हा व्हिडीओ तुमच्या कामाचा असू शकते!👇


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();