टॉप बातम्या

चोरी करणाऱ्या दोघांना अटक; ११ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेत सुमारे ११.३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा वणी/पांढरकवडा पथक घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत असताना, दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी मोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी सुशील जेंगेवार यांनी त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात इसमांनी सोने-चांदीचे दागिने चोरी केल्याची तक्रार दिली होती. यावरून पोलीस स्टेशन मोरेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या दागिन्याचे छायाचित्र 

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी ही चोरी केली असून त्यांनी चोरी केलेले दागिने पुसद येथील सराफ व्यावसायिकाला विकले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही बालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींच्या कबुलीनुसार पुसद येथे जाऊन सराफाकडून चोरीचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालात विविध प्रकारचे दागिने असून त्यांची एकूण किंमत सुमारे ११,३७,०७५ रुपये आहे. तसेच या प्रकरणी दत्ता कुरकुटे (रा. नागवाडी, ता. पुसद) यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी त्याला मोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन भिजे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();