| AI |
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत वणी शहरातील एका दुकानातून प्रतिबंधित पानमसाला व खर्रा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदाराविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास मेन पोस्ट ऑफिससमोर असलेल्या “मामा पान सेंटर” येथे अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य) यवतमाळ यांनी तपासणी केली. या दरम्यान दुकानात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला.
या कारवाईत पानमसाला (सिग्नेचर) 2 पाकिटे, पानमसाला (विमल) 1 पाकीट, पानमसाला (पानपराग) 1 पाकीट तसेच सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित खर्रा अशा एकूण 55 पुड्या असा मिळून सुमारे 1.47 किलो वजनाचा व अंदाजे 3,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या लेखी फिर्यादीवरून आरोपी सय्यद नवाज अली सय्यद बशीर अली (वय 32, रा. माळीपुरा रोड, वणी) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कलम 26(2), 27(3), 30(2)(अ), 59 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 123, 274, 275, 223 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.