टॉप बातम्या

झरीजामणी तालुक्यात आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक शोषणाच्या विरोधात ‘उलगुलान मोर्चा’ची हाक


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

झरी (जामणी) : पांढरकवडा उपविभागीय क्षेत्रातील रेती घाटांमधील घडामोडी, घडुकुल लाभार्थ्यांवरील अन्याय तसेच प्रशासनाच्या कथित गैरकारभाराच्या विरोधात आंबेडकरी जनआंदोलन वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने ‘उलगुलान मोर्चा’ काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. घडुकुल लाभार्थ्यांना मोफत रेती न देता माफियांना लाभ मिळत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आयोजकांनी केली आहे.

या मोर्चाचे विशेष नेतृत्व देशकबाबू खोब्रागडे व अनिल तेलंग करणार असून, विशेष सहभाग म्हणून सरपंच कैलास मडावी उपस्थित राहणार आहेत. दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तिर शांमदादा कोलाम चौक येथून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. विविध गावांतील नागरिक, विशेषतः आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, घडुकुल, रमाई व पंतप्रधान आवास योजनांतील लाभार्थ्यांना नियमानुसार मदत मिळत नसल्याचा आरोप करत, अवैध रेती विक्रीतून काही जण आर्थिक लाभ घेत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. आदिवासींच्या हक्कांवर गदा येत असल्याने या सर्व प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();