टॉप बातम्या

वणीत आघाडीची जोरदार लाट; जेष्ठापासून ते युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : थंडीची सकाळ असो किंवा संध्याकाळची वेळ, महाविकास आघाडीचा प्रचार मात्र प्रचंड जोमात सुरू असून शहरात आघाडीची मजबूत उपस्थिती जाणवत आहे. जेष्ठापासून ते युवकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सतत होत असलेल्या कॉर्नर सभा, चर्चासत्रे आणि बैठकींमुळे मविआचा प्रचार इतरांपेक्षा पुढे जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

उबाठा काँग्रेस मनसे व संभाजी बिग्रेड आणि मित्र पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांच्या  पॅनलला नागरिकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. घराघरातील संवाद, नियोजनबद्ध प्रचार आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे या पॅनलकडे मतदारांचा कल अधिक वेगाने वाढत असल्याचे दिसते.

वणी शहराच्या बदलासाठी, विकासासाठी आणि नव्या दिशा देण्यासाठी महाविकास आघाडीचा आवाज अधिक बुलंद होताना दिसत आहे. प्रभागातील वातावरणात उत्साह, आशा आणि नव्या परिवर्तनाची चाहूल स्पष्ट जाणवत आहे.

वणीतल्या राजकीय वातावरणात मविआची चर्चा अधिक वाढत असून निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस जोर पकडत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();