सामाजिक कार्यकर्ते मंगलबांबू चिंडालिया यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रख्यात व्यावसायिक मंगलबाबु चिंडालीया यांचे 19/5/2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षाचे होते.त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 4 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे ठेवण्यात आला. 

विदर्भवादी मंगलबाबु चिंडालिया हे पत्रकारिता, राजकीय व सामाजिक क्षेत्रात नेहमीच सक्रिय असायचे. ते मनमिळाऊ स्वभावाचचे व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती. त्यांच्या अशा जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, स्नुषा, व नातवंडं अशा बराच मोठा आप्त परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते मंगलबांबू चिंडालिया यांचे निधन सामाजिक कार्यकर्ते मंगलबांबू चिंडालिया यांचे निधन Reviewed by सह्याद्री चौफेर on May 20, 2025 Rating: 5
Powered by Blogger.