सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेस चे सरचिटणीस तथा अपक्ष उमेदवार संजय खाडे हे आपले अर्ज मागे घेणार की, निवडणूक लढणार अशी जोरदार उत्सुकता मतदार संघात शिगेला पोहचली होती. आज (ता. 4) ला दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित करून खुद अपक्ष उमेदवार खाडे यांनी आपण "शिट्टी" या चिन्हा वर निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला शिवसेने (उबाठा) ला सोडचिट्टी दिलेले जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, सुनील वरारकर, पुरोषत्तम आवारी, प्रशांत गोहोकार, गौरीशंकर खुराणा, तेजराज बोढे, शंकर वऱ्हाटे, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे, तुळशीराम कुमरे, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले,आपण या पंचवीस वर्षात काँग्रेस मध्ये निष्ठावान राहून पक्षासाठी काय काय कार्य केले हे सांगताना अपक्ष उमेदवार खाडे हे क्षणभर गहिवरले. उमेदवारी मागे न घेता ते लढणार यामुळे महायुती, महाविकास आघाडीच्या रणनीतीत मोठा बदल झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानात याचा कसा परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मविआ ने आपले तिकिट कापल्यामुळे संजय खाडे नाराज झाले. अखेर पक्ष अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षाचा फार्म बाद झाला आणि अपक्ष म्हणून ते रिंगणात उतरले आहे. विशेष म्हणजे वणी हा काँग्रेस चा बालेकिल्ला असून खाडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये या आग्रहास्तव कार्यकर्त्यामधून विनंती होती.
आज सोमवारी वसंत जिनिंग येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितलं की,मी काँग्रेस चा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी जनतेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. माझ्या मायबाप जनतेसाठी सदैव तत्पर राहून त्यांचा आवाज बनणार, हा माझा दृढ निश्चय आहे. आणि हा लढा सर्वसामान्यांसाठी आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता दिसत असून संजय खाडे यांच्यामुळे वणी मतदार संघात आता मात्र निवडणूक चूरशीची होण्याची शक्यता दाट आहे. या चौरंगी लढतीत अधिकृतांना चांगलाच घाम फुटणार आहे.
मीच पक्षाची मोट बांधलीया मतदारसंघात गत तीस वर्षांपासून शिवसेनेचा डोलारा सांभाळला. कार्यकर्त्यांची खुली चर्चा करीत पक्षाची मोट बांधली. अप्रामाणिक नेतृत्वाकडे उमेदवारी बहाल झाल्याची खंत व्यक्त करीत मतदारसंघातील शिवसैनिकांनी संजय खाडे यांचा विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.- माजी आमदार विश्वास नांदेकर
काँग्रेस गायब झाल्याची नाराजीपरंपरागत काँग्रेस मतदारसंघ संघात ऐनवेळी कलाटणी मिळाली. काँग्रेसचा पंजा या मतदारसंघातून गायब होणे हा दुखवटा मनात रुचत आहे. मात्र, खाडे यांचेसमवेत काँग्रेस विचारी कार्यकर्ता व मतदार सक्रीय आहे. निश्चितच मतदार राजा हा निष्क्रिय व सक्रीय उमेदवारांचा गांभीर्याने विचार करेल. तशा आशयाची ताकद आम्ही निष्ठावान म्हणून लावू.- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे
मविला मोठा धक्का : अखेरपर्यंत अपक्ष उमेदवार ठाम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 04, 2024
Rating: