यवतमाळ जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर 528 गवळी समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार

 सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
               
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील श्रीकृष्ण नगरी मांडवा या गावांमध्ये 40 ते 50 परिवार पाच दशकांपासून राहत असून भारत देशाला स्वातंत्र्य मिळाला परंतु आजही गावाला जोडणारा मुख्य रस्ताच नसल्याने श्रीकृष्ण नगरी या गावांमध्ये जाण्या-येण्याकरता नदी नाल्यातून वाट काळात जावे लागते.परंतु गेल्या दहा वर्षभरापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता असून स्थानीय आमदार संदीप दुर्वे असून आजवर केळापूर आर्णी घाटंजी या मतदारसंघातील बहुसंख्येने असलेला गवळी समाजाचे श्रीकृष्ण नगरी (मांडवा) हे होय परंतु माननीय आमदार साहेबांकडे वारंवार पाठपुरावा करूनही आजवर गावाला जोडणारा मुख्य रस्ता झालाच नाही.

गेल्या वर्षी 2023 या काळामध्ये 15 ऑगस्ट च्या दिवशी घाटंजी पांढरकवडा रोड वरती चक्का जाम आंदोलन करूनही तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन यांच्यावतीने दखल सुद्धा घेतली गेली नाही, तरी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता गावाचा विकास गावाला जोडणारा मुख्य रस्ता गावात रस्ते नाल्या पिण्याच्या पाण्याची सोय नसून शासनाने तातडीने सर्व करून देण्यात यावे. श्री कृष्ण नगरी या गावाला तसे नाही झालेसस्तर विधानसभा निवडणुकांमध्ये मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण गवळी समाज हा मतदान करणारच नाही जोपर्यंत गवळी समाज बांधवांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार असेल, अशा आशियाचे संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी महोदय डॉ. पंकज आशिया यांना निवेदनाच्या माध्यमातून तक्रार देण्यात आली. तरी शासनाने जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा यवतमाळ जिल्ह्यातील गवळी समाज बांधवांचे संघटनेचे दोन लाख पंधरा हजार मतदान हे होणारच नाही असे स्पष्ट भाषेत गवळी समाजाचे नेते व गवळी समाज संघटना 528 चे महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिगंबरभाऊ टी आर अवथळे (पाटील) यांनी जिल्हाधिकारी साहेबांशी बोलताना स्पष्ट केले.
 
यावेळी कळंब तालुकाध्यक्ष ऋत्विक भोंगाळे तसेच घाटंजी तालुका अध्यक्ष उमेश साठे वेळापूर तालुका अध्यक्ष दीपक बोपटे श्रीकांत डोळे मधुकर भड आदेश साठे विशाल साठे तसेच गवळी समाजातील बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर 528 गवळी समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार यवतमाळ जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर 528 गवळी समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on September 08, 2024 Rating: 5
Powered by Blogger.