मंगला ठक हिंगणघाट विधानसभा लढवण्यास इच्छुक!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वर्धा : सामाजिक कार्यकर्त्या, महिला काँग्रेस हिंगणघाट माजी महिला तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगला ठक ह्या हिंगणघाट विधानसभा लढवण्यास इच्छुक असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष यांना पत्र देऊन विधासभेची तिकीट द्यावी अशी मागणी केली आहे. 

सामाजिक दायित्वाची जाण असलेल्या मंगला ठक या तळागाळातील लोकांसाठी काम करणाऱ्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहे. त्या समाजातील अनेक गरजू व पीडित लोकांची मदत करित असतात. अनेक जनकल्याणाच्या योजना समाजापर्यंत त्या पोहचवत असून गेल्या अनेक वर्षापासून त्या काँग्रेस च्या विचारधारेशी जुळलेल्या असून मागील 5 वर्ष त्या हिंगणघाट महिला तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत त्यांनी काँग्रेस मजबुती करणाचे काम केले. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क हिंगणघाट विधासभेत चांगला आहे.
त्यामुळे हिंगणघाट विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी त्या इच्छुक असून त्यांनी भारतीय काँग्रेस पक्षाकडे तिकीट मिळावी यासाठी पदर पसरला आहे. जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ चांदूरकर यांचेकडे निवेदन सादर केले असून ही मागणी आदरणीय राहुलजी गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांचेकडे शिफारस करावी, अशी आग्रही विनंती निवेदनात प्रामुख्याने नमूद आहे. यावेळी वरिष्ठ नेते शेखर भाऊ शेंडे व अन्य काँग्रेस नेते, पदाधिकारी, व कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

त्यामुळे माजी महिला तालुका अध्यक्ष मंगला ठक यांना हिंगणघाट विधानसभेची तिकीट मिळेल का? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 
मंगला ठक हिंगणघाट विधानसभा लढवण्यास इच्छुक! मंगला ठक हिंगणघाट विधानसभा लढवण्यास इच्छुक! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 08, 2024 Rating: 5
Powered by Blogger.