सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील वनोजा देवी येथील परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याने मनसेच्या महिला तालुका अध्यक्षा उज्वला चंदनखेडे यांच्या उपस्थितीत स्थानिक महिलांनी धाड टाकून देशी दारू चा अड्डा उधळून लावला. ही धाडशी कारवाई काल रविवारीला दुपारी 2 वाजता च्या दरम्यान करण्यात आली. महिलांच्या आक्रोशाने अवैध दारू विक्रेत्याची दानादान उडाल्याची चित्रे समाज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे.
मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वनोजा देवी परिसरात गेल्या अनेक दिवसापासून अवैध दारू विक्रीचा प्रश्न गंभीर बनत चालला होता, याबाबत अनेक मौखिक लेखी तक्रारी होत्या, परंतु हा अवैध विक्रेता व पुरवठादार संगणमत करून प्रशासनाला हाताशी धरून देवी सारख्या धार्मिक स्थळी पाप करून स्वार्थ साधत होते. यामुळे संतापलेल्या असंख्य महिलांनी उज्वला चंदनखेडे व रोशन शिंदे यांना पाचारण करून घेत त्याचा ठावठिकाण पिंजून काढत येथील देशी दारू चा अड्डा उध्वस्त करून काही दारूच्या पेट्या ताब्यात घेत पोलिसांना माहिती दिली. महिलांनी दारू पकडल्याने कुंभकरण अवस्थेत असलेल्या पोलिस प्रशासनाने तातडीने वनोजा देवी गाठत अवैध दारू अड्डयावर पोहचले, तत्पूर्वी दारू विक्रेत्याला जॉब विचारला असता त्याने शिवागीळ केल्याने महिलांनी त्याला चोप दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, विदर्भाचे आराध्य दैवत असलेले जनामाय कासामाय हे हेमांड पंथी मंदिर याच परिसरात असल्यामुळे या ठिकाणी व गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांसह पुरवठादारांचे कायमस्वरूपी मुसके आवळण्याची तीव्र मागणी नारीशक्तीनी ची आहे.
मात्र,ऐन सण उत्सवाच्या पर्वावर ही मनसे स्टाईल झाल्याने परिसरातील दारू तस्कर व अवैध दारू विक्रेते चांगलेच धास्तावले आहेत. तर अनेकांकडून नवनिर्वाचित महिला तालुका अध्यक्षा उज्वला चंदनखेडे यांच्यासह स्थानिक महिलांनी हे धाडस दाखवल्याने कौतुक केले जात आहे.मात्र,पोलीस प्रशासनाबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आहे.
वनोजा देवी परिसरातील विक्रेत्यांचे कायमस्वरूपी मुसके आवळण्याची गरज का आहे :
तालुक्यातील अनेक गावात खुलेआम गावकऱ्यांचा प्रचंड विरोध झूगारत मुजोरीने अवैध दारू विक्री काही विक्रेते करतात. हेच अवैध दारू विक्रेते गावातील महिलांशी उद्धटपणे सुद्धा वागतात, शिवाय गावातच दारू मिळत असल्याने शाळेकरी मुलांवर याचा वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याची तालुक्यातील गावखेड्यातील महिलांच्या तक्रारी आहेत. मात्र, स्थानिक सरपंच,पदाधिकारी व पोलीस पाटील, शासनाचे कर्मचारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे, परंतु त्यांचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे गावागावात सामाजिक स्वास्थ्यास प्रचंड बाधा पोहचत आहे. किंबहुना अनेक युवक व्यसनाधीन होत कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे कायमस्वरूपी मुसके आवळण्याची आता गरज निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे धार्मिक स्थळ असल्यामुळे वनोजा देवी येथील दारू विक्री बंद करणे अति आवश्यक आहे.
नारीशक्तीनी उधळून लावला अवैध दारूचा अड्डा व विक्रेत्याला दिला चोप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 09, 2024
Rating: