सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना-युवासेना मारेगाव शाखा यांच्या माध्यमातून हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तालुक्यासह मारेगाव परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर व युवासेना तालुका प्रमुख तुकाराम वासाडे विकसनशील युवा नेतृत्व असून अनेक सामाजिक बांधीलकी जपत गोरगरिबांना कायमच मदत करीत असतात. विकासाचे महामेरू पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गौसेवा व वृक्षारोपण करण्यात आले. अनेक कारणांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असून तो थांबविण्यासाठी वृक्ष जतन करणे काळाची गरज आहे. सर्वांनी वृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी केले. याप्रसंगी विजय मेश्राम उप तालुका प्रमुख, तुकाराम वासाडे युवासेना तालुका प्रमुख, सचिन ढोके युवासेना उपतालुका प्रमुख, डॉ बदकी शहर संघटक, तेजस कापसे युवासेना उपशहर प्रमुख, शंकर नागोसे युवासेना, राज कापसे शहर प्रमुख, कुंदन ताजने, अरविंद परचाके, अनिल राऊत, हरिभाऊ रामपुरे, जीवन वैद्य, महादेव लोणारे, शंकर कापसे यांच्या सह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन वृक्षलागवड केली. विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसैनिकाकडून पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.
पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व वृक्षारोपण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 30, 2024
Rating: