शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वांजरी (मजरा) येथील एका शेतकरी नवयुवक पुत्राने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज शुक्रवारी (17 मे) ला साडेपाच वाजता दरम्यान उघडकीस आली. या घटनेने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ओंमकार किशोर लडके (वय 18) असे गळफास घेतलेल्या नवयुवकाचे नाव आहे. आज दिवसभर ओमकार गावातच फिरत होता, पाच वाजता च्या दरम्यान तो घरी गेला असे समजते. दरम्यान,त्याचे मोठे वडील आपल्या वर मजल्यावरील खोलीत गेले असता ओमकार हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. परिवारातील लोकांनी त्यास लगेच खाली उतरवून उपचारासाठी वणी येथे नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.ग्रामीण रुग्णालय चिकित्सक यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ओमकार च्या अकाली निधनाने लडके कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले. घटनेची माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. 

आई वडिलांना एकुलता एक असलेल्या ओमकार च्या आत्महत्येचे कारण अद्याप तरी अष्पष्ट आहे. मृतकाचे वडील किशोर लडके हे शेती करतात व शेतीला जोडधंदा म्हणून आटो ने शालेय विद्यार्थ्यांना ने-आन करतात अशी माहिती आहे. 
Previous Post Next Post