खैरी-वडकी रोडवर टिप्पर ,कार व मोटरसायकलचा तिहेरी अपघात

 सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : दिनांक २९-४-२४ रोजीचे रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान खैरी-वडकी रोडवर डबलशिट मोटरसायकल स्वार हे वडकीकडे जात असतांना पेंट्रोल संपल्यावर ते मोटरसायकल थांबवुन उभे असतांना खैरी कडुन येणाऱ्या चारचाकी वाहन क्र.एम.एच.०४ ई.टी.०७६५ या कारने मोटरसायकल स्वारांना जोरदार धडक देऊन समोरुन येत असलेल्या टीप्पर क्र.एम.एच.४० वाय १९५१ या टिंप्परला जोरदार धडक दिल्याने ती कार विरुद्ध दिशेने रोडच्या बाजुच्या नालीच्या कडेला जाऊन पडली. मात्र त्यामध्ये असलेले वाहनचालक व सोबत असलेल्या व्यक्तीनी मात्र त्या कार मधुन निघुन पसार झाले. यावरुन नेमकी ही कार कुठली आणि कोणाची आणि कारचालक व सोबतीला असलेले पळून जाण्याचे कारण काय यावर मात्र संशय व्यक्त केल्या जात आहे. सदर अपघाची माहीत वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांना देण्यात आली ते अपघातस्थळी पोहचुन पंचनामा केला. मात्र, पंचनामा केल्यानंतर अपघातग्रस्त वाहने ही पोलिस स्टेशनला जमा करण्याची जिम्मेदारी ही पोलिसांची असतांना मात्र चक्क वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार महाले यांनी मात्र रेती तस्करी करणाऱ्याचकडे ते अपघातग्रस्त दोन्ही वाहणे वडकी पोलिस स्टेशनच्या आवारात आणण्याची जिम्मेदारी दिली. अपघातग्रस्त वाहणे ही पोलिस स्टेशनला जमा करण्याची जिम्मेदारी ही पोलिसांची असतांना मात्र चक्क रेती तस्काराकडेच अपघातातील दोन्ही वाहणे पोलिस स्टेशनला आणण्याची जिम्मेदारी देण्याचे कारण काय? हे मात्र वडकी ठाणेदार यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. 

या गंभीर विषयाकडे जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी लक्ष देऊन पोलिसांच्या कर्तव्यावर असतांना कसुर केल्या प्रकरणी कारवाई करण्यात येइल का? असे नागरिकांतून चर्चील्या जात आहे.
खैरी-वडकी रोडवर टिप्पर ,कार व मोटरसायकलचा तिहेरी अपघात खैरी-वडकी रोडवर टिप्पर ,कार व मोटरसायकलचा तिहेरी अपघात Reviewed by सह्याद्री चौफेर on May 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.