महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांनी पाळला 'ब्लॅक डे'

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
    
वणी : महाराष्ट्र वाद्यातर्फे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे 1 मे रोजी विदर्भातील संपूर्ण 11 ही जिल्ह्यात आणि तालुक्यात 'काळा दिवस' (Black Day) पाळला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून वणी मारेगाव झरी तालुक्याचे वतीने वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजता दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 

विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनाचा निषेध करित स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी प्रा.पुरुषोत्तम पाटील यवतमाळ जिल्हा प्रमुख, देवराव धांडे पाटील शेतकरी नेते व नारायण गोडे समाजसेवक यांची भाषणे झालीत. यावेळी बोलताना प्रा. पाटील आपल्या भाषणात म्हणालेत 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार करून विदर्भाच्या जनतेला बळजबरीने महाराष्ट्रात सामील करण्यात आले. परंतु नागपूर कराराच्या कलमापैकी एकही कलम पाळले गेले नाही. त्यामुळे विदर्भात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कुपोषण, सिंचनाचा अनुशेष, आमदार खासदारांची संख्या कमी झाली, रोजगारासाठी तरुणांना मुंबई पुणे नाशिक कडे जावे लागत आहे, विदर्भात विद्युत प्रकल्प आहेत परंतु विदर्भ तासोगणती अंधारात असतो, त्यालाच प्रदुषणाचा त्रासही सहन करावा लागतो, राज्यावर प्रचंड कर्जांचा डोंगर वाढत आहे.अशा अवस्थेत विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच या समस्ये वर रामबाण उपाय असल्याचे प्रा.पाटील आपल्या भाषणात म्हणाले. 

या कार्यक्रमाला प्रा.पुरुषोत्तम पाटील, राहुल खारकर,प्रा बाळासाहेब राजुरकर, नामदेव जेनेकर, धीरज भोयर देवराव पाटील धांडे, होमदेव कनाके, दशरथ पाटील,संजय चिंचोलकर, धिऱज भोयर, बालाजी काकडे, पुंडलिक पथाडे, नारायण गोडे, प्रभाकर उईके, सिध्दार्थ ताकसांडे, प्रा.विजय बोबडे, अंबादास वागदरकर, अशोक चौधरी, प्रा.नितीन मोहितकर, गजेंद्र भोयर, भाऊसाहेब आसुटकर, सुरेश राजुरकर, बबनराव ठाकरे, विठ्ठल येरगुडे, गजानन ठाकरे, प्रमोद जवादे, रोहित येंगड, संबा बोरकर यांच्या सह असंख्य विदर्भवादी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांनी पाळला 'ब्लॅक डे' महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांनी पाळला 'ब्लॅक डे' Reviewed by सह्याद्री चौफेर on May 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.