आपटी येथे शिवजयंती उत्सहात साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दिनांक 18/02/2024 रोज रविवार ला आपटी येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती निमीत्य शिवजयंती व्याख्यान तसेच शिव रॅली आयोजीत करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजभाऊ चामटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून विनाताई सातपुते, सरपंच,  श्री हनुमानजी बावने उपसरपंच, सौ वैशालीताई गंधारे (पो.पा.), तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य उपस्थीत होते.

या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून श्री. कपील राऊत सर तसेच मार्गदर्शक म्हणून संदिप कोल्हे सर उपस्थीत होते.

शिवजयंती निमीत्य बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. तसेच गावातील भजने सुद्धा या  रॅलीत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल किन्नाके यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक शिक्षक श्री सहारे सर यांनी केले.
Previous Post Next Post