टॉप बातम्या

वणी येथे मुस्लिम जोडप्यांचा निकाहचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येथील आशियाना हॉल मध्ये 30 डिसेंबर रोज शनिवार ला शहरातील सुपरिचित आमेर बिल्डर अँड डेव्हलपर व्यावसायिक जमीर खान उर्फ जम्मूभाई यांच्या पुढाकारातून मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक निकाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात एकूण 21 तरुण-तरुणींचे जोडपे विवाहबध्द होणार आहे.

या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी जमीर खान, हाजी रफिक शेख इब्राहीम, रज्जाकभाई पठाण, हाजी असलम चिनी, मो.एजाज, बबलू दिवाण, हाजी निसार अहेमद, हाजी ईसराईल खॉ शाबान खॉ, अकरमभाई, सुलेमान खान, हबीबभाई, शमशेर खॉन, सैय्यद अतिक, अशफाक खॉ मेहबूब खॉ, अन्वर अयाती, मुन्ना खॉन, साकीब इकबाल यांच्या सह मुस्लिम समाज बांधव परिश्रम घेत आहे.
Previous Post Next Post