सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : श्रीमती सुशिला दाऊपुरे यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार, दि.31 आक्टोंबर 2023 ला पहाटे 5 वाजता निधन झाले आहे. त्यांचे मृत्युसमयी वय 80 वर्षाचे होते. सौ.मंगला गीत घोष यांच्या आई तसेच मा.गीत घोष यांच्या त्या सासू होत.
श्रीमती सुशिला दाऊपुरे यांच्या पच्छात त्यांच्या लहान बहीण श्रीमती कमल ब्राम्हणे तसेच मुली सौ.मंगला घोष, वैशाली वानखेडे, श्रीमती सुषमा धाबर्डे व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आजच म्हणजे मंगळवार 31 आक्टोंबर 2023 ला सायंकाळी 4 वाजता घोंसा येथे होणार आहे. अशी माहिती जावई गीत घोष यांनी दिली.
श्रीमती सुशिला दाऊपूरे यांचे अल्पशा आजाराने निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 31, 2023
Rating: