Top News

लोकप्रतिनिधीच्या गावात कार्यालयीन अधिकारी गेले बाराच्या भावात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : कार्यालयाला न येता दांडी मारणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर  सत्ताधाऱ्यांचा वचक राहिला नसल्याने बहुतांश काही वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे महत्वाचे काम खोळंबून जातात, यांचा नाहक त्रास जनतेला होतो. 

शहरातील काही प्रमुख कार्यालयात मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी निरीक्षण केले असता यात बांधकाम विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद विभाग, तालुका क्रीडा विभाग, भूमी अभिलेख विभाग, पंचायत समिती विभाग, दारू बंदी कार्यालय, या विभागातील वरिष्ठ अधिकारी गायब असल्यामुळे त्यांना शंका निर्माण झाली, चिंता व्यक्त करित यांना नक्षलवाद्यांनी उचलून तर नेले नसावे म्हणून त्यांनी पोलिसात धाव घेतली व चौकशी करण्यात यावी अशी तक्रार केली.

शहरातील पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी शिपाई, एसडीपीओ, तहसीलदार, एसडीओ, एवढेच आपल्या कार्यालयात अधिकारी हजर असतात. मग इतर अधिकारी कुठे? असतात असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला असता, तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी मिटींग, दौऱ्याच्या नावाखाली आपल्या कार्यालयातून हे अधिकारी दांडी मारत कामावर हजर न राहिण्याचा जणू सपाटाच लावला की काय? असे बोलल्या जात असताना याचा नाहक त्रास जनतेला होत आहे.

वणी उपविभाग असल्यामुळे इथे सर्वांनाच काहींना काही कामासाठी यावंच लागतं. मात्र, या विभागातील वरिष्ठ अधिकारी कधी जनतेच्या हाती लागत नसल्याने यांचा मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे त्यांच्या शोध घेण्याची तक्रार उंबरकर यांनी केली आहे.

केंद्र, राज्य सरकारच्या योजना शहर व गावपातळीवर यशस्वी करण्यात या कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळेच अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यास नागरिकांना मदत होत असते. अशातच अधिकारी यांच्यासोबत जिल्हा, तालुका पंचायत कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली जाते. एक-दोन तासात ही बैठक संपल्यानंतर सर्वजण पुन्हा आपापल्या कार्यालयात न जाता इतरत्र जात आहेत. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक राहिला नसल्याने "लोकप्रतिनिधी गावात, कार्यालयीन अधिकारी गेले बाऱ्याच्या भावात" अशी म्हणायची वेळ आता आली आहे.

वणी तालुका हा नक्षलग्रस्त जिल्ह्यांना लागून असल्याने या अधिकाऱ्यांचे नक्षल्यांनी अपहरण तर केले नसावे, या चिंतेने मनसे नेते राजू उंबरकर यांनी वणी पोलिसात तक्रार दिली व चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Previous Post Next Post